महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात रोशन मोरुले यांच्या शेतात हरभरा पिकाची शेतीशाळा नुकतीच पार पडली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी धनविजय सर यांनी हरभरा पिकातील मर रोखण्यासाठी उपाययोजना, एकात्मिक कीड नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी.
20 पक्षी थांबे, कामगंध सापळ्यांचा उपयोग यावर माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक सुशांत तामगाडगे आणि कृषी सहाय्यक सौरभ चौधरी यांनी हरभरा पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, यावर माहिती दिली. तसेच पक्षी थांबे व कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी शेतक-यांकरिता सांघिक खेळ घेण्यात आले. गावातील बाबाराव डंभारे, विकास नारांजे, रोशन मोरूले , रमेश नरांजे, बंडुजी पाल व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या