Type Here to Get Search Results !

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

वणी :

        भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला. 

      वणी तालुक्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम येथील शासकीय मैदानावर घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. त्यानंतर वणी उपविभागात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी, अधिकारी, बी एल ओ. यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यानंतर शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात प्राथमिक शाळा गटातून प्रथम बालविद्यामांदिर प्राथमिक शाळा, द्वितीय विवेकानंद प्राथमिक शाळा, तृतीय क्रमांक नगर परिषद शाळा क्रमांक 6 ने पटकावला. उच्च प्राथमिक शाळा गटातून प्रथम क्रमांक स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय एस.पी.एम. हायस्कूल, तृतीय क्रमांक वणी पब्लिक स्कूल ने पटकावला. मधामिक शाळा गटातून प्रथम क्रमांक विवेकानंद विद्यालय वणी, द्वितीय आदर्श हायस्कूल, तृतीय क्रमांक जनता विद्यालयाने पटकावला. 

     या प्रसंगी आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकूरवार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश कींद्रे, पोलिस निरीक्षक अनिल बेहराणी, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे प्रामुख्याने उपस्थित होते. या मुख्य कार्यक्रमाचे आयोजक तहसीलदार निखिल धुळधर हे होते. 

     सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण अतुल डफ, जयंत कुचनकर व अभिलाष राजूरकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रंचालन नायब तहसीलदार विवेक पांडे व गजानन कासावार यांनी केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad