Type Here to Get Search Results !

'शिक्षकां सारखा दुसरा प्रबोधनकार नाही' - प्रोफे. डॉ. प्रमोद गिरी

वणी :

        'शिक्षकां ईतकं समाज प्रबोधनाचे कार्य दुसरा कोणी करू शकत नाही. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शिक्षकच लागतो. मी आजही जी. एम. सी. नागपूर च्या ज्ञान मंदिरात रोज शिकवायला जातो तेव्हा माझ्यातील प्रॅक्टिशनर बाजूला राहातो. 'ज्ञान बाटनेसे बढता है, घटता नही!' त्या शिवाय समाज समोर जाणार नाही.' असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन प्रोफे.डॉ. प्रमोद गिरी यांनी लायन्स क्लब व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बक्षीस वितरण, क्लबचे माजी अध्यक्ष, माजी विद्यार्थी व शिक्षक गौरव कार्यक्रम प्रसंगी केले.

      शाळेचे व लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात संस्थापक सदस्य प्रमोद देशमुख, क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी शाळेचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, ट्रस्टी व सदस्य सौ. ललीता बोदकुरवार, सुनीता खुंगर, विणा खोब्रागडे, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे अतिथी म्हणून उपस्थित होते.

         दोन विद्यार्थ्यां पासून १९७५ साली सुरू झालेल्या, लायन्स इंग्लिश स्कूलमध्ये आज २०४० विद्यार्थी शिक्षण घेतात हे गौरवास्पद आहे. आज माझे स्थान हे केवळ शिक्षणामुळे आहे म्हणून शिक्षकांनी स्वाभिमान बाळगून, विद्यार्थ्यांच्या इंटेलिजन्स कोशंट सोबत इमोशनल कोशंट ही समजून घेतला पाहिजे. 

हाती घेतलेल्या कार्याला समाज सेवा समजून प्रबोधन करा. जीवनाचे समाधान पैशांत नसून सेवेत आहे. कष्टा शिवाय पर्याय नाही. स्काय इज द लिमिट या शब्दात विद्यार्थी व शिक्षकांना प्रोफेसर डॉ. प्रमोद गिरी यांनी मार्गदर्शन केले.

     तसेच लायन्स संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या डायलिसिस सेंटर साठी स्वतः तर्फे मशीन देईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रसंगी संस्थेच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक व अतिथी प्रोफे. डॉ. प्रमोद गिरी यांना शाल श्रीफळ व 'सेवा महर्षी' सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.

     तसेच पाहुण्यांच्या हस्ते क्लबचे माजी अध्यक्ष डॉ   आत्मारामजी चौहान, डॉ विलास कोंडावार, प्राचार्य अनिल हूड, डॉ दिपक हूड, प्रमोदराव देशमुख, सुभाषराव देशमुख, प्रभाकरराव मुसळे, पुरुषोत्तम खोब्रागडे, किशन चौधरी, संजीवरेड्डी बोदकुरवार, महेंद्र श्रीवास्तव, राजाभाऊ पाथ्रडकर, चंद्रकांत जोबनपुत्रा, बलदेव खुंगर, ललीता बोदकुरवार,

          माजी विद्यार्थी डॉ प्रतीक ऊत्तरवार, डॉ संकेत अलोणे, डॉ भक्ती काकडे, डॉ ललित लांजेवार, डॉ सचीन मुसळे, डॉ रेशम छुगवानी, इंजि हर्ष खुंगर, मयुरी भंडारी, सी. ए. कमल मदान

 तसेच माजी प्राचार्य स्व.एन. आय. रजवी मॅडम  श्री. प्रशांत गोडे यांना (३५ वर्ष सेवा पुरस्कार), तसेच श्रीमती चित्रा पाथ्रडकर, चित्रा देशपांडे, रविंद्रनाथ लिचोडे, मिरा काळे, गणेश कोल्हे,लंकेश चुरे, शुभांगी चोपणे आदी शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

        श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.राजाभाऊ पाथ्रडकर यांनी प्रास्ताविक केले. मुग्धा खानझोडे व मोनिका पाईकराव यांनी संचालन केले तर प्रा चित्रा देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता झाली.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी सहकार्य केले. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad