वणी :
शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढल्याच बातम्या प्रकाशित झाल्या. तसेच नागरिकांच्या अनेक तक्रारी निवेदनातून देण्यात नगर परिषद ला देण्यात आला. या सर्व बाबीची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व निर्बीजीकरण करण्यासाठी मोकाट कुत्रे नियंत्रण संकलन वाहनपथका मार्फत शहरात मोहीम राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या प्रभागातील व परिसरातील मोकाट कुत्र्यांची माहिती नगर परिषद ला देऊन कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी केले.