बाभुळगाव (यवतमाळ) :
म.रा. किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन बाभुळगाव तहसिल कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेत्रुत्व राज्य उपाध्यक्ष काॅ.अनिल घाटे, राज्य कौंसिलर काॅ. अनिल हेपट, काॅ.गुलाबराव उमरतकर, भाकपचे राज्य कौंसिलर काॅ. दिपक माहुरे, अमरावती जिल्हा सचिव काॅ. सुनिल मेटकर, काॅ. हिम्मतराव पाटमासे यांनी केले.
शेतकऱ्याची संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. शेतमालाची खरेदी नाफेड व सिसीआय मार्फत हमी भावात करण्यात यावी,bशेतमाल विक्रीचा हमीभावाचा 20% भावाचा वाढीव फरक देण्यात यावा, शेतीचे पांदन रस्ते दुरुस्त करुन द्यावे, शेतकऱ्याच्या मुलांना मोफत शिक्षण व बसेसचे मोफत पासेस देण्यात यावे. लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश दिलेल्या निवेदनात करण्यात आला. मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या