प्रतिनिधी / वर्धा (मंगेश राऊत) :
आदीवासी विभाग महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी शाळेचे वर्ध्याच्या इतिहासातील पहिलेच विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन हे विध्यार्थीनमध्ये असलेल्या जिज्ञासू, चिकित्सक शोधक बुध्दीला कृतीत उतरवून नवनवीन विज्ञानाचे प्रयोग, प्रकल्प,शोध यांचे प्रदर्शन ईतरांना प्रोत्साहित करून आपलीही नोंद त्यानिमित्ताने घेतली जावी यासाठी विध्यार्थी सहभाग घेत असतात. मात्र हेच विध्यार्थी भुत भानामती, आत्मा पिशाच्च, मांजर आडवी जाणे, कुत्र्यांचे भुंकणे,पालीचे चुकचुकने, अंगात येणे, अघोरी अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती,लिंबूला हळदी कुंकू सुया टोचलेले घराजवळ आढळणे,अशा अनेक अंधश्रद्धांना बळी पडतात. कारण आपण विज्ञानाचे पदवीधर शिक्षक प्राध्यापक असूनही विज्ञान ख-या अर्थाने अर्थात वैज्ञानिक दृष्टिकोन जिवणात अंगिकारले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तो रूजू शकला नाही आपल्यात व विद्यार्थ्यांमध्ये जिवण जगताना चिकित्सक, शोधक बुध्दी निर्माण करावयाची मनापासून इच्छा असल्यास स्वा:हात आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आदीवाशी प्रकल्प वर्धा विभागाच्या वरीष्ठ अधिकारी मा नंदीणी धावंजेवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले.
आदीवासी विभाग महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी प्रकल्प वर्धा विभागाच्या अन्तर्गत येणा-या विविध आदीवाशी शाळेच्या पाच ते दहा वर्गातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन वर्धे जवळील वायगाव निपाणी येथील ठाकरे अनुदानित आदीवाशी आश्रम शाळेत वर्धा जिल्हाच्या इतिहासात प्रथमच भरविल्या गेले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नंदीनी धावंजेवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार , मुख्याध्यापक महाकाळकर, मुख्याध्यापक माहूरे, मुख्याध्यापक सौ. चौधरी मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी गजेंद्र सुरकार यांनी विज्ञानाचे चमत्कार व बुवा बाबा देवी माता महाराज पिर, पाद्री फाॅदर जे चमत्कार करून भोळ्या भाबड्या समाजाला विशेषतः हा महिलांना फसवणूक करून त्यांचे शारीरिक मानसिक आर्थिक शोषण करतात. यात फार मोठा फरक आहे विज्ञानाचे चमत्कार हे फसवणूक करत नाही कारण ते मानवाच्या उत्कर्षासाठी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामी येते त्या प्रत्येक चमत्कारामागे कार्यकारणभाव भाव लपलेला असतो तर जे बुवा बाबा देवी माता पिर महाराज पाद्री फाॅदर चमत्कार करून दाखवतात. ते बदमाशी हातचलाखी वस्तूत घडामोड रसायनांचा वापर,विज्ञानाचा सहयोग घेऊन चमत्कार घडवून आणून प्रसिद्धीच्या माध्यमातून फसवतात याला राजकारणीही प्रोत्साहन देतात मात्र आजपर्यंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा चमत्काराला आव्हान देत पंचवीस लाख रूपयाचे बक्षिस जाहीर केले आहे जे पसतिस वर्षात कोणीही मिळवू शकले नाही तर हजारो अशा बुवा बाबा देवी माता पिर महाराज पाद्री फाॅदर यांचा भांडाफोड करून समाजासमोर उघडे पाडून त्यांचा खरा चेहरा समोर आणला आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जादुटोणा विरोधी कायदा केला, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अनेक साहित्याची निर्मिती केली आहे, प्रशिक्षणे, प्रबोधन करत आहे. याप्रसंगी अनेक चमत्काराचे सादरीकरण विद्यार्थ्यांना सहभागी करून सर्वांसमक्ष करून चमत्कारामागिल हातचलाखी बदमाशी हातचलाखी वस्तूत घडामोड रसायनांचा वापर करून कसे चमत्कार करतात हे दाखवून चमत्कार होत नसतात कोणीही करू शकत नाही तंत्र मंत्र यात काहीही तथ्य नाही असे अनेक उदाहरणे देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे समजावून सांगितले.
विज्ञान प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन फित कापून आदीवाशी प्रकल्प विभागाचे मा डेकाटे व ईतर अधिकारी यांनी केले ज्यात एकाहून एक सरस विज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर करुन त्याची माहिती दिली कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्रयोगांना पारीतोषिक देवून विध्यार्थी व संबंधित विज्ञान शिक्षकांना प्रमाणपत्र, मोमेंन्टो देवून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ढगे यांनी तर आभारप्रदर्शन सुनिता फाळके यांनी रेकेले प्रस्ताविक भारत मेश्राम यांनी केले कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील सातही आदीवाशी आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाकरे अनुदानित आदीवाशी आश्रमशाळेचे अध्यक्ष पदाधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या