Type Here to Get Search Results !

बोथलीच्या उत्कर्ष मेश्रामची नवोदयसाठी निवड

 

प्रतिनिधी/ बुट्टीबोरी (मंगेश राऊत) : 

                                               बोथली (बुट्टीबोरी) येथील उत्कर्ष ज्ञानेश्वरी आनंद मेश्राम या इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्याची नवोदयसाठी  निवड झाली आहे. नवोदय २०२५ प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. उत्कर्षने नवोदय प्रवेश परीक्षा उतीर्ण करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

             सुपर सिक्स अकॅडमीचे शिक्षक मा. किशोर राऊत सर , मा. विनोद जांभुळे सर, साक्षी डोंगरे मॅडम, पूजा चव्हाण मॅडम , आई ज्ञानेश्वरी व भाऊ सिद्धांत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. उत्कर्ष हा वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा सचिव प्रा. आनंद मेश्राम यांचा पुत्र आहे. आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ तसेच सुपर सिक्स अकॅडमीच्या शिक्षकांना दिले. गुरुकुल पब्लिक स्कूलचे प्राचार्य, शिक्षक, मित्र व आप्त स्वकीयांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad