Type Here to Get Search Results !

अनुलोम च्या माध्यमातून वणी भागात ३३ वस्तीमध्ये महाकुंभ तीर्थकलश दर्शन

 

वणी : 
        अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक संरसतेचा मंत्र घेऊन वणी भागात महाकुंभ तीर्थ कलश दर्शन सोहळे घेण्यात आले. 
        प्रयागराज येथे दिनांक १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान भरलेला महाकुंभमेळा आता संपन्न झाला आहे.  हा ४५ दिवसांचा धार्मिक कार्यक्रम होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भाग घेतला. परंतु ग्रामीण भागातील भक्त  'महाकुंभ' ला जाऊ शकले नाहीत, त्यांच्या पर्यंत तीर्थकलश दर्शन आणि जल पोहोचवण्याचे कार्य अनुलोम च्या माध्यमातून उपविभाग प्रमुख सुनीलजी दालवनकर, भाग जनसेवक वैभवजी मेहता, भाग जनसेवक वैभवजी सुर यांनी केले.
          या तीर्थकलश दर्शन सोहळामध्ये ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत, दीपकजी नवले सर, घनशामजी आवारी सर, चिंतेश्वरजी वैद्य, गजाननजी विधाते, प्रज्योतजी हेपट, अमितजी उपाध्ये यांनी सामाजिक समरसता या विषयावर मार्गदर्शन केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad