वणी :
येथील लायन्स क्लब वणी ला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन डॉ. रिपल राणे (डिस्ट्रिक्ट 3234 एच 1) यांनी अधिकारीक भेट दिली व नवीन सदस्यांचा समावेश व शपथविधी कार्यक्रम पार पडला.
दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ राणे, माजी आमदार तथा वणी लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी मंचावर उपस्थित होते.
यावेळी नवीन सदस्य सर्वश्री प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे,प्रा. डॉ. अभिजित अणे, डॉ. विजय राठोड,सौरभ बरडिया, डॉ. हिमांशू लाल,हर्ष खुंगर,यश श्रीवास्तव, संजीवरेड्डी चिंतलवार, भिकमचंद गोयनका व ऍड.ओंकार आर.देशपांडे यांना डॉ. रिपल राणे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. मनोगत व्यक्त करतांना त्यांनी लायन्स इंटरनॅशनलच्या सेवा कार्याची माहिती देऊन, लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल वणी ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल , सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेऊन लायन्स इंटरनॅशनल द्वारा 'बेस्ट एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी अवॉर्ड' देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांनी लायन्स क्लब व सदस्यांचे अभिनंदन केले व पीन प्रदान केली.
लायन्स क्लब वणी च्या उत्कृष्ट कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी राजाभाऊ पाथ्रडकर यांना गोल्ड मेडल देऊन तसेच लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांना एम जे एफ या करीता सन्मानीत करण्यात आले. या वेळी लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच संस्थापक सदस्य लायन प्रमोद देशमुख व लायन दत्तात्रय चकोर यांच्या हस्ते डॉ. राणे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 'बेस्ट लायन इन द रिजन व बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड' मिळाल्या बद्दल लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार व उपाध्यक्ष बलदेव खुंगर यांचे हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले तर ध्वज वंदनेचे वाचन लायन महेंद्र श्रीवास्तव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पल्लवी जेनेकर यांनी तर सूत्रसंचालन पोर्णिमा खिरटकर यांनी केले, लायन किशन चौधरी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य सुधिर दामले, चंद्रकांत जोबनपुत्रा, नरेंद्र बरडिया, रमेश बोहरा, डॉ. के आर लाल, शांतीलाल पांडे, पुरुषोत्तम खोब्रागडे, तुषार नगरवाला, ललीता बोदकुरवार, सुनिता खुंगर, मंजिरी दामले, निर्मला पांडे, विणा खोब्रागडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या