Type Here to Get Search Results !

महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे व स्मारक वर्धा शहरात उभारा

प्रतिनिधी/ कोरा (मंगेश राऊत) :

                                              वर्धा शहरात जवळ जवळ अनेक महापुरुषांचे पुतळे चौका चौकात उभे राहिले तर सावरकर यांचे भव्यदिव्य स्मारक तर राजमाता जिजाऊ, संत तुकडोजी महाराज यांचे छोटेसे स्मुरल चित्र शहरात उभे करण्यासाठी आमदार, खासदार व नगर परिषदेने पुढाकार घेऊन उभे कले तर शहर विकास निधीतून आणि या सर्व पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्याची मोहीमच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आपला विकास निधी देवून  केला. मात्र महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा त्यांचे स्मारक वर्धा शहरात निर्माण त्यांच्या नावाने सांस्कृतीक भवन नगर परिषदेच्या जागेवर निर्माण करावे अशी साधी कल्पना आमदार डॉ. पंकज भोयर, खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर अथवा नगर परिषदेला आली नाही किंवा आतापर्यंत ज्यांची ज्यांची राजकीय पार्टीची सत्ता नगर परिषद मध्ये होती किंवा स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जे जे खासदार आमदार नगरसेवक झाले. त्यांनीही या बाबतीत पुढाकार घेतला नाही किंवा त्यांच्या ध्यानी मनी आले नाही हि बाब लक्षात घेऊन सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मारक समितीची स्थापना विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येऊन केली.

                              या समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा नगर परिषदेच्या प्रांगणात बसवावा तसेच नगर परिषदेच्या जुन्या पडीत जागेवर सरकारी रूग्णालया समोररील जागेत अथवा ठाकरे मार्केट मधील अर्धवट झालेल्या बांधकामाच्या जागी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे. जे सतत सर्वांना प्रेरणास्थान असेल तसेच वर्धा शहरात महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन बांधावे यासह साई नगर येथील उद्यानाला सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले उद्यान असे नाव द्यावे. यासाठी वर्धा नगर परिषदेचे प्रशासक यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा निवेदनातून व चर्चेतून देण्यात आला.

                         छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पहिल्यांदाच शोधून संपूर्ण जगाला त्यांची सर्वसामान्यांनाचे राजे हि ओळख करून देणारे त्यांच्यावर पोवाडा लिहून त्यांचे कार्यकर्तृत्वाचा इतिहास मांडणारे पहिली शिवजयंती साजरे करणारे, ब्राम्हणी कर्मकांड विरूद्ध चळवळ उभी करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून संघटन कौशल्य दाखविणारे, शेतक-यांचा आसुड हे पुस्तक लिहून शेतक-याची दैन्यावस्था सरकार व समाजा समोर ठेवणारे, शिक्षणाची गंगा संपुर्ण भारतभर पसरवून दिन दलित, आदीवासी, भटके, अनुसूचित जनजाती ओ.बि.सी. अतिदलित महिला यांना शिक्षणाच्या  मुख्य प्रवाहात आणणारे.

                         ज्यामुळेच आज राष्टपती पंतप्रधान, मुख्यमंत्री मंत्री ते मुख्य सचिव, कलेक्टर, पोलिस अधीक्षक ते चपराशी पर्यंत नोकरीत सहभाग घेवू शकले तर अनेक लेखक, कवि, विचारवंत, आमदार खासदार झाले म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. ज्योतिबा फुले यांना आपल्या गुरूस्थानी मानत होते. मात्र अशा या दोन्ही महामानव असलेल्या म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा किंवा स्मारक वर्धा शहरात किंवा जिल्ह्यात निर्माण झाले नाही हि आंम्हा वर्धेकर व वर्धा प्रशासनासाठी , स्थानिक आमदार, खासदार यांच्यासाठी शरमेची बाब आहे.

               कारण यामागे जातिय राजकिय मानसिकता,भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार धारेवर चालणा-या संघटनांचा छुपा विरोध आहे हे आजही दिसून येते. पुण्यातही पहिल्यांदा म.ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवू नये म्हणून त्यावेळी टिळकांनी प्रखर विरोध केला होता व केसरीत भारताचे दुष्मण असा लेख टिळकांनी लिहला होता. वर्धा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार, हे ओ.बि.सी.असूनही हा विरोधाभास आहे याला ब्राम्हणी प्रवृत्तीचा कावा मानावा काय असे चर्चे व्दारे मांडण्यात आले. ज्याला मुक संमती दिसली त्यामुळे सत्यशोधक म. ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मारक समिती च्या वतीने आज सत्यशोधक म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून निवेदन देण्यात आले. यावेळी गजेंद्र सुरकार, डॉ. अशोक चोपडे, गुणवंत डकरे, प्राचार्य डॉ. मोहनिश सवाई, ॲड नंदकुमार वानखेडे, अशोक कांबळे,  प्राचार्य जनार्दन देवतळे, राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, विनय डहाके, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad