भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त द ग्रेट पिपल्स ग्रुप, वणी यांच्या वतीने दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ०७:०० वाजता पासून दुपारी ०१:०० वाजेपर्यंत वणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक आगळीवेगळी अभिवादनाची संकल्पना राबविण्यात येत आहे. पारंपरिक पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्याऐवजी, पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्दिष्ट बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाचा मंत्र पुढे नेणे आणि समाजात वाचनाची आवड निर्माण करणे आहे. भेट दिलेली पुस्तके शहरातील व ग्रामीण वाचनालयांमध्ये पोहोचवली जातील. पुस्तके ही बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर, भारतीय राज्यघटनेवर, स्पर्धा परीक्षांवर किंवा समाजजागृतीस उपयुक्त असावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.9112078507 वर संपर्क साधा.
यावेळी प्रशासन अधिकारी, सामाजिक संस्था, पतसंस्था, समाजिक कार्यकर्ता व राजकीय नेत्यांनी देखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या