तालुक्यातील एकमेव 'अ' दर्जाच्या नगर वाचनालयामध्ये उद्या दिनांक 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब यांच्या जीवनावर वाचनालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची प्रदर्शनी घेण्यात येणार आहे.
या पुस्तक प्रदर्शनीचे उद्घाटन सकाळी ०९:०० वाजता उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या हस्ते होणार आहे.
तरी ग्रंथावर वर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनींनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी नगर वाचनालयात आयोजित या ग्रंथ प्रदर्शनीच्या अभिनव उपक्रमाला भेट देण्याचे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या