Type Here to Get Search Results !

नगर वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन

वणी : 

         येथील ’ अ ’ दर्जाच्या नगर वाचनालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या वाचनालयात असलेल्या सर्व पुस्तकांचे प्रदर्शन दिनांक 14 एप्रिलला भरविण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार हे होते. 

        ग्रंथ प्रदर्शनाची फित पाहुण्यांनी कापल्यानंतर डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या ग्रंथांचे अवलोकन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांची खरी ओळख ही संविधान निर्माते दलितांचे उद्धारक एवढ्या पुरतीच सर्वसामान्यांमध्ये आहे. पण बाबासाहेबांचे कार्य हे खूप मोठ होत. ते संविधान निर्माते तर होतेच. पण त्यासोबत त्यांनी ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, ऊर्जामंत्री, बांधकाम मंत्री म्हणून अनेक मोठ्या कामांची पायाभरणी त्यांनी केली. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते. प्रख्यात कायदेतज्ञ, धर्मचिकित्सक, मान्यताप्राप्त तत्त्वज्ञानी, ज्येष्ठ मानववंश शास्त्रज्ञ, अभ्यासू वक्ते, चिंतनशील लेखक, बहुश्रुत संपादक, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, जलनीती  तज्ञ , शिक्षण तज्ञ, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुजीवक अशा वेगवेगळ्या स्वरूपातील त्यांचे काम खूप मोठे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करावा असे आवाहन केले. 

      अध्यक्षीय भाषणातून सरपटवार म्हणाले की, बाबासाहेबांना बालपणापासून ग्रंथ वाचनाचे वेड होते. पुस्तके खरेदी करून जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करण्याच्या छंदाने त्यांना झपाटलेले होते. त्यामुळेच ते विश्व रत्न होऊ शकले. प्रत्येकांनी या दिवशी नियमित पुस्तक वाचनाचा प्रण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन अर्जुन उरकुडे यांनी केले. या प्रदर्शनाचा लाभ वणीकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. याप्रसंगी हरिहर भागवत, विशाल झाडे, राजाभाऊ पाथ्रडकर, उत्तमराव गेडाम, डॉ. महेद्र लोढा, प्रशांत भालेराव, विशाल काळे, अनुराग काठेड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रंथालयाचे देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad