Type Here to Get Search Results !

खासदार मा अमर काळे यांनी घेतली पोष्टर प्रदर्शनीची दखल

प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) : 

                                           महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दि ११ एप्रिल सत्यशोधक म ज्योतीराव फुले जन्मदिन आणि दि १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा जन्मदिन हा महाराष्ट्र भर ३६५ शाखांच्या माध्यमातून सामाजिक समता सप्ताह म्हणून विविध उपक्रम घेवून साजरा करते. या अन्तर्गतच जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक म. ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी पोष्टर प्रदर्शन बजाज सार्वजनिक वाचनालय येथे लावण्यात आली. त्याचे उद्घाटन वर्धा जिल्हाचे खासदार मा. अमरभाऊ काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या नाविण्यपूर्ण माहिती असलेल्या प्रदर्शनीची दखल घेऊन लगेचच स्विय सहाय्यक मा. गोडे यांना महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या कडून या प्रदर्शनेची पि.डि.एफ.घेण्यास सांगून गजेंद्र सुरकार यांनी हि माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सार्थक प्रयत्न केल्यास बद्दल अभिनंदन केले.

                          महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमिच संत, विचारवंत, महामानव यांच्यी जयंती स्मृतीदिनी नाविण्यपूर्ण आणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृतीशील व समाजाला त्यातून नविन पर्याय दिशा देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच बुवा बाबा देवी माता पिर पादरी यांचा भांडाफोड सुरवातीला करणारी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हि २५ विभागाच्या माध्यमातून संविधान जागर, पर्यावरण, स्त्रीपुरूष समानता, जातपंचायत,विवेकवाद अनेक सण उत्सवाला पर्याय देणारी ठरली राज्य शासनाने समितीच्या पाच उपक्रमाला स्विकारून दरवर्षी सरकार प्रबोधनपर कार्यक्रम राबविते. उदा.पर्यावरण पुरक गणेश विसर्जन, संविधान,व्यसन,मानसिक आरोग्य, सर्पविज्ञान तर स्थानिक शाखेव्दारे या वर्षीपासून म ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक पुरस्कार तर प्रदर्शनीच्या माध्यमातून या दोन्ही महापुरुषांच्या विविध क्षेत्रात त्यांचे कार्य, योगदान याची जी माहिती सर्वसामान्यांपर्यंत आता पर्यंत पोहचली नाही माहिती नाही. ती विविध माध्यमांतून मिळवून ती पोष्टर प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

                                  यावेळी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे, महिला विभागाच्या राज्य सहकार्यवाह सारिका डेहनकर, कायदा विभागाचे जिल्हा कार्यवाह ॲड नंदकुमार वानखेडे विविध उपक्रम विभागाचे प्रमुख सुनील ढाले, प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे,शहर शाखा कार्याध्यक्ष कविता राठोड, कार्यकर्ते संघर्ष डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad