प्रतिनिधी/ कोरा (मंगेश राऊत) :
हिंगणघाट कोरा चिमूर रोडचे गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम सुरू असून अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. मात्र रोडचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कोरा ते नंदोरी रोडवर व कोरा ते चिमुर रोडवर अनेक खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात झालेले आहे व होत आहे व पुढे होईल मात्र याची दखल घेताना कोणताही अधिकारी व पदाधिकारी दिसत नाही. रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व अधिकारी व पदाधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे अनेक कुटुंबांना आपल्या आधारस्तंभांना गमवावे लागले. अनेक अपघातातून लोक अजूनही सावरलेले नाही असेच पुढे चालू राहिले तर कितीतरी लोकांना प्रवाशांना आपले जीव गमवावे लागेल. आपल्या शरीराचे अवयव गमवावे लागेल अशी परिस्थिती हिंगणघाट कोरा रोडची प्रत्यक्षात दिसून येत आहे, मात्र याची दखल घेतल्या गेली नाही तर जनसमूह एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार राजूभाऊ तिमांडे यांनी दिला. दिनांक 16 ला 05:30 वाजता च्या दरम्यान दुचाकी वाहनाने कोऱ्या वरून हिंगणघाट ला जात असताना वाशी गावाजवळ बँक कर्मचारी सौ. भारती जुमडे यांचा अपघात झाला.
मोठ्या प्रमाणात त्यांना डोक्याला मार लागला मात्र तेवढ्यातच माजी आमदार राजू तिमांडे हे त्याच रोडनी येत असताना त्यांना अपघात दिसला. लगेच त्यांनी आपल्या गाडीमध्ये त्यांना घेऊन हिंगणघाटच्या काकडे हॉस्पिटल मध्ये नेले, मात्र डोक्याला जबर मार लागल्यामुळे भारती जुमडे यांना सिटीस्कॅन व एम आर करिता व पुढील उपचाराकरता मेघे सावंगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या अपघाताची जबाबदारी कोण घेईल ? असा थेट प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मात्र अधिकारी व पदाधिकारी मूंग गिळून गप्प आहे.
लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करून, चांगल्या प्रतीचे रोडचे काम झाले नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करू -- माजी आमदार राजूभाऊ तिमांडे
रोडचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहून वाहने चालवावी.
चिमूर हिंगणघाट रोडवर हेवी वाहने व अति लोड असलेली वाहने मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र चालतात अशी तक्रार कंत्राटदारांकरून आली.
पोलीस स्टेशन गिरड व आरटीओ ऑफिस हिंगणघाटला याविषयी तक्रार देण्यात आली.
- प्रशांत धमाने
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगणघाट
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या