वणी :
संपूर्ण भारत देश्यामध्ये संस्कृतिक दृष्टया प्रबळ असणाऱ्या मराठा सेवा संघ या संघटनेची स्थापना १ सप्टे १९९० ला अकोला येथे करण्यात आली. चार्वाक महावीर शिव बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन सुरू झालेल्या, बौद्ध, कम्युनिस्ट, सत्यशोधक अश्या अनेक पुरोगामी चळवळीचा वैचारिक आधार घेऊन क्रांतीपुरूष युगनायक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी स्थापन केलेल्या या संघटेने जात,पात,धर्म,पंथ,प्रदेश या पलीकडे जाऊन " मराठा " या एका व्यापक शब्दामध्ये हे संघटन सुत्रित केले. समाजामध्ये अनिष्ट आणि विकृत शक्तिकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या शोषणाचा प्रतिकार करण्यासाठी हे एक प्रबळ वैचारिक संघटन सुरू केले.
कर्मचारी, महिला, तरुण, विद्यार्थी, शेतकरी, अश्या अनेक घटकांना एकत्रित करण्यासाठी विविध बत्तीस कक्षाची उभारणी केली. आज पर्यंत पस्तीस वर्षात अनेक क्रांतिकारी कार्य केलेल्या या संघटनेने आज राज्य आणि देश्यामध्ये अनेक प्रकारचे शोषण, विकृती, अत्याचार सुरू असताना या प्रबोधन पर्वाची गरज लक्षात घेत मा. सौरभ दादा खेडेकर यांनी अनेक समविचारी संघटना व व्यक्तींना सोबत घेऊन प्रबोधन यात्रा व मराठा जोडो अभियान सुरू केले आहे.
ही रथयात्रा दि. १८ मार्च ला भोसलेगडी, वेरुळ येथून सुरुवात झाली आहे. हे प्रबोधनपर्व पुढे ४५ दिवस चालणार आहे आणि समारोप १ मे ला लालमहाल पुणे येथे होणार आहे.
दरम्यान दि. १० एप्रिलला या रथयात्रेचे आगमन वणी येथे होणार आहे, या दरम्यान होणाऱ्या वणी शहरातील स्वागतासाठी तसेच प्रबोधन सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादासजी वागदरकर व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष भारतीताई राजपूत व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयजी धोबे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या