प्रतिनिधी/ कोरा (मंगेश राऊत) :
दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) निकाल ७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वासी येथील विद्यार्थिनी कु. धनश्री झाडे, कु. साक्षी तळवेकर आणि कु. नंदिनी वागदे यांनी यश संपादन केले होते.
गुणवत्ता यादीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये कु. धनश्री संदीप झाडे आणि कु. साक्षी मनोहर तळवेकर यांचे नावे समाविष्ट झाली आहेत. या गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळण्याचा मान मिळाला आहे. धनश्री व साक्षीने यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षक वृंदांना दिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थिनींचे, मार्गदर्शक शिक्षिका सौ. शितल पाटील मॅडम, मुख्याध्यापक व संपूर्ण शिक्षकवृंद यांचे श्री लैलेशजी जाधव अध्यक्ष (शा. व्य. स.),सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख श्री. विनोदजी पालवे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. अशोकजी गिदेवार साहेब यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या