वणी :
गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्राचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गजानन कासावार तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होत्या. याप्रसंगी आयुर्वेदिक औषधी निर्माण विधी करीता बिहार हुन आणलेल्या "खरल पुजन "करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शारदा स्तवन व स्वागतगीत विजय गंधेवार यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत उपचार केंद्राच्या संचालिका डॉ.सुवर्णा चरपे यांनी उपचार केंद्राच्या वतीने वर्षभरात राबलेले सामाजिक, नवरात्रोत्सवातील स्त्रीरोग मोफत रोगनिदान व औषधी वितरण शिबिर, कोजागिरी पौर्णिमेला दम्याचे शिबिर, सोरायसिस, त्वचाविकार मोफत रोगनिदान व उपचार शिबिर, वातविकार तपासणी शिबिर यांची सविस्तर माहिती दिली. उपचार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मणगाव, तह.भद्रावती येथे "माझी आरोग्यदायी शाळा" हा वार्षिक उपक्रम शिक्षिका हर्षदा शेंडे यांच्या सहाय्याने राबवण्यात आला. त्यात एकुण साठ विद्यार्थ्यांना दिनचर्या, ऋतूचर्या, ऋतूपरत्वे फळे, फुले, भाज्यांचा वापर उपचार म्हणून कसा करावा,? मसाल्याच्या डब्यातील पदार्थांचा प्रथमोपचार म्हणुन उपयोग, व्यायाम,ध्यान धारणा महत्व , प्रकृती हे विषय प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन वर्गांव्दारे वर्षभर माहिती सत्र राबवण्यात आले. याची फलशृती म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचा कल फास्टफुड, बिस्किटे ,पाकिटच्या पदार्थांपेक्षा घरगुती जेवणाकडे सजगतेने वाढला तसेच विद्यार्थी ऋतूजन्य सर्दी, खोकला, पोटदुखी यासाठी लवंग, विलायची, सुंठ, दालचिनी सिद्धजल वापरायला लागले आहेत.
उपचार केंद्रात " दैनंदिन आरोग्य प्रश्न मंजुषा" व्दारे दररोज आरोग्यपर प्रश्नोत्तरे हा वार्षीक उपक्रमातील उत्फुर्त व जिज्ञासू वाचक व सलग बारा महिने सलग विजेत्या हर्षदा शेंडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभरातील सहर्ष मदतीला धावून आलेले वार्ताहर पुरुषोत्तम नवघरे, परशुराम पोटे व सुनिल ठाकरे यांचाही शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.
यापुढे कमीतकमी किमतीमध्ये उत्तम औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतः वटी गुटी निर्माण करण्याचा संकल्प उपचार केंद्राच्या संचालिका वैद्य. चरपे यांनी केला. मागील वर्षभर या पद्धतीने उपचार घेवुन बरे झालेल्या रुग्णांनी स्वतः चा अनुभव कथन केला. तारा कुळकर्णी, प्रशांत गोडे, अलका वैद्य यांनी उपचार केंद्रातील विश्वास व सौदार्हपुर्ण अनुभव सादर केले. डाॅ.अनघा खोकले, डॉ.अनुश्री गोडे, डॉ.मिलन पिदुरकर, डॉ.अभिषेक पटले यांनी श्री विश्व योग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्रात लवकरच आंतररुग्ण विभाग सुरु व्हावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुण्या अँड.कुळकर्णी यांनी केंद्रातर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक व अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात गजानन कासावार यांनी वैदय. चरपे यांच्या कडुन रुग्णसेवा व शास्त्रसेवा उत्तरोत्तर वाढत जावो अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सफलतेकरीता निखिल वाघाडे, गौरव शिलमनवार, शीला शिलमनवार यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या