शहरात दि. १४ एप्रिल रोजी द ग्रेट पिपल्स ग्रुप यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ७ वाजता आगळी
वेगळी अभिवादन संकल्पना राबवण्यात आली. पारंपरिक पुष्पहाराऐवजी, पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमात प्रशासन अधिकारी, सामाजिक संस्था व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पुतळा सजावट समितीतर्फे आंबेडकरी समाजबांधवांसाठी अल्पोपहार (चहा) चे आयोजन करण्यात आले. महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलना करीता भारतीय बौद्ध महासभा तर्फे स्वाक्षरी अभियान सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत राबविण्यात आली. बस स्टॅन्ड समोर दुपारी १२ वाजता भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ रायपुरे यांनी धम्म भोजन आयोजित केले. खाती चौक येथील सायंकाळी ६ वाजता इजहार भाई मित्र परिवार तर्फे मिरवणूक रॅलीतील समाजबांधवांना बिस्कीट वाटप करण्यात आले.
विविध वॉर्डांतून आलेल्या रॅली एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीम जनसागराचे दृश्य निर्माण झाले. समाजबांधव उपस्थितांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन करून सामूहिक वंदना घेतली.
कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर व पोलीस कर्मचारी पूर्ण वेळ बंदोबस्तात होते. शेवटी आंबेडकरी समाजबांधवांकडून पोलीस प्रशासनाचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या