या शोभायात्रेमध्ये विविध देखावे असणार आहेत – अयोध्येतील रामलल्लांची देखणी मूर्ती, श्रीकृष्ण, भगवान शंकर आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच, वणी शहराला भजनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थानच्या भजन मंडळीसह विविध ठिकाणांहून आलेली भजनी मंडळी आपली कला सादर करणार आहेत.
याशिवाय, रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे. विशेष आकर्षण म्हणून हरियाणातील ‘लाईव्ह हनुमान’ देखील या शोभायात्रेत सहभागी होणार आहे.
दिनांक ६ एप्रिल रोजी संपूर्ण वणी शहर भगवामय होईल. चौका-चौकात रांगोळ्यांनी सजावट केली जाईल. जुनी स्टेट बँक जवळील राम मंदिर येथे संध्याकाळी ५ वाजता प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल.
ही शोभायात्रा राम मंदिर (जुनी स्टेट बँक) येथून सुरू होऊन श्याम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्ग, श्री रंगनाथ मंदिर चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सरोदे चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक मार्गे पुन्हा राम मंदिर येथे पोहोचेल आणि महाआरतीने समारोप होईल.
या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती श्री प्रभू राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या