Type Here to Get Search Results !

मनसेच्या शहराध्यक्षपदी अंकुश बोढे यांची निवड (३ उपाध्यक्ष, सचिव, संघटक सह विविध पदावर नियुक्त्या)

वणी/ प्रतिनिधी : 

                           विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षनेते राजू उंबरकर यांच्या तर्फे  एका पत्रकाद्वारे मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. 

             आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा संघटन बांधणी कडे लक्ष केंद्रित केले. याच अनुषंगाने नुकतीच वणी येथील शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालयात पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. बैठकीनंतर आज पक्षाच्या वणी शहराची कार्यकारणी घोषित करण्यात आली. 

                    या मध्ये शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शहरातील युवा उद्योजक अंकुश बोढे यांना देण्यात आली. तर त्यांच्या मदतीला शहर उपाध्यक्ष म्हणून मयूर गेडाम, मयुर घाटोळे व विलास चोखारे, शहर सचिव म्हणून शंकर पिंपळकर, संघटक म्हणून अमोल मसेवार यांच्या वर सर्वानुमते या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आज या सर्व पदाच्या घोषणा करण्यात आल्या असून लवकरच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

                    या निवडी वेळी मनसेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, वाहतूक सेनेचे  राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, अनिस सलाट, गोविंदराव थेरे, दिलीप मस्के, बंडू येसेकर, वैशाली तायडे, ज्योती मेश्राम, वैभव पुराणकर, गौरव पुराणकर, जुबेर खान, मनोज नवघरे, संकेत पारखी, सतीश आवारी, अनिल चार्लीकर, कृष्णा कुकडेजा यांच्या सह शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 

            प्रसंगी पक्ष नेते राजू उंबरकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यास व संघटनात्मक बांधणीसाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील सर्व मूलभूत सुविधा, समस्या व प्रश्नांना घेऊन त्या सोडविण्यासाठी  पक्षाच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरून त्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आपल्या निवडी नंतर दिली.


       मनसेच्या शहर कार्यकारणीत नवनियुत पदाधिकारी 

          वणी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शहरातील युवा उद्योजक अंकुश बोढे शहर उपाध्यक्ष —  मयूर घाटोळे, मयुर गेडाम व विलास चोखारे, शहर सचिव — शंकर पिंपळकर, संघटक –  अमोल मसेवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad